माझा परिचय साहित्य स्पंदन अनुक्रमांक 01 ते 10

               *माझा परिचय *

*संपूर्ण नाव :-*1. क्रांती शंकरराव बुद्धेवार

*पत्ता :-* देशमुख नगर बिलोली ता. बिलोली जि. नांदेड.
*मोबाईल क्रमांक :-*7588427335

*Email id :-*krantibuddhewar@gmail.com
*साहित्य स्पंदन समूह क्रमांक :-* 1
*व्यवसाय किंवा नोकरी :-* प्रा. शिक्षक

*साहित्यातील आवड :-* चारोळी करणे आणि वाइल्डलाइफबद्दल स्वतःचे अनुभव लिहिणे.

*ही आवड केंव्हापासून आहे :-* 2011 पासून

*स्वतः विषयी मनसोक्त लिहा :-*लहानपणापासून हॉस्टेल मधे शिकून आईच्या माघारी वाढलेला मी मुलगा.
वडिलांच्या आशीर्वादाने व वडील भावांच्या मार्गदर्शनामुळे आज जीवनाच्या इथपर्यंतच्या टप्प्यात पोहोचलो आहे.  
            लहानपणी वाटायचे की, एखादा साइंटिस्ट व्हावे आणि आता शिक्षक झाल्यामुळे एखादा साइंटिस्ट झाल्यापेक्षाही मोठा आनंद मिळतो आहे. स्वतःचे कर्त्तव्य हेच स्वतःचे ध्येय समजून चालतो.
            स्वतःच्या आवड़ीबद्दल सांगायचे म्हणजे, मला वाइल्डलाइफ फोटोग्राफी करणे आवडते. मी महाराष्ट्र शासनाचा (नांदेड वनविभाग) अधिकृत सर्पमित्र आहे. आजवर हजारो सापांचे प्राण मी विविध ठिकाणाहुन वाचवले आहेत. त्याचबरोबर सर्पदंश झालेल्या व्यक्तिंना योग्य असे मार्गदर्शन देऊन त्यांचे जीव वाचविल्याचे समाधान मिळवतो आहे.  माझ्या मित्रांसोबत सर्पदंश व्यवस्थापन व सर्पजनजागृतिचे कार्यक्रम राबवित असतो. फक्त सर्पकार्य नसून प्रत्येक वन्यजीव संरक्षणासाठी प्रयत्नशील आहे.
             आता पक्षीनिरिक्षण व त्यांचा अभ्यास चालू आहे.
             
*साहित्य स्पंदन समूहा विषयी लिहा :-* तसा मी 2011 पासून साहित्याकडे वळलो परंतु खरी प्रेरणा मिळाली ती नासा सरांची ओळख झाल्यावर. त्यांच्यामुळे मला साहित्यमंथन, साहित्यदर्पण आणि आता साहित्य स्पंदन मिळाले. 
             साहित्यस्पंदनला माझ्या हृदयात एक विशेष स्थान आहे कारण एक तुटलेल्या घरातील सदस्यन्ना जोडण्याचे काम प्रा. वैशालीताईंनी केले आहे. वेळेअभावी मी स्पर्धेत प्रत्येकवेळी सहभाग नोंदवू शकलो नाही परंतु यापुढे माझे योगदान देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन.
               माझ्यासारख्या नवख्या साहित्यिकाला शिकण्याची संधी दिल्याबद्दल प्रा. वैशालीताई, सर्व एडमिन व साहित्यस्पंदनचे मनःपूर्वक आभार!

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••


Comments

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष साहित्य

Super 30 साहित्यिक पुरस्कार 2019

नववर्ष शुभेच्छा