खुली कविता स्पर्धा


खुली कविता स्पर्धा भाग चौथा

[4/15, 10:09 AM] ‪+91 96374 37412‬:
🍁 स्पर्धेसाठी कविता 🍁

✍ वराडची माती✍

सुखादुखाले पेलते
माही वराडची माती
मोठे संकटं झेलते
माही वराडची माती ....!!

सदा उभी पाठीमांग
असा कणखर बाना
कमी पाण्यात फुलते
माही वराडची माती.....!!

किरकेट हाकी संग
खोखो कबड्डी न कुस्ती
मोठी मस्तीत खेलते
माही वराडची माती ......!!

पराटीच्या बोंड़ोबोंडी
सारं पांढरचं सोनं
उभ्या तुरित डोलते
माही वराडची माती ......!!

बंधुभाव तिच्यापाशी
नाही उचनीच कोणी
सारे समान तोलते
माही वराडची माती .....!!

नायी झुकत ती कुठे
किती हिनवलं तरी
सदा तोर्यात बोलते
माही वराडची माती ......!!

विशाल कन्हेरकर
निंभा जि अमरावती
मो 9637437412

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

[4/15, 10:36 AM] ‪+91 94213 45341‬: साहित्य स्पंदन स्पर्धा करिता.मुक्त कविता
**********************
संगीता सपकाळ बीड.9421345341.
संगीता कदम
मित्र नगर बीड
**************
स्री मुक्तीचा नारा
---------------------------
आजवरच्या स्री जन्म कहाणीचा
बांधलेला पाशाचा जोखड
कोणी सोडलाच नाही.
स्री मुक्तीचा नारा मनांच्या नभात
कधी निनादलाच नाही.
सोसली,नांदली,भोगली ती जगली
बोलली ती अत्याचारली,मारली,जाळली संपली
संपली नाही.......
ती भुमातेशी विलीन झाली..अंकुरली.
पुन्हा नव्याने जन्माला आली
जोखड तोडुन रणरागीणी अवतरली.
तडफडणा-या न्याय निखा-याची नजर तीला आली.
अजवरचाया स्री जन्म कहाणीचा
बांधलेला पाशाचा जोखड
कोणी सोडलाच नाही.
स्री मुक्तीचा नारामनांच्या नभात
कधी निनादलाच नाही.

[4/15, 11:32 AM] ‪+91 96731 27794‬: स्पर्धेसाठी कविता.
*************(15|4|17)))))))))))))
दु:ख वांझपणाच
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆

मातृत्वाला नव्हता पाझर.
वांझ पणाला पडली बळी.
मुल बाळ नव्हत नशीबी.
वाझं म्हणुन ओळख वेगळी.

कसा दैवाचा हा खेळ.
दोष होता सारा तिच्यात.
मुल बाळ नव्हत होत.
निंदा तिची सर्वत्र जोमात.

मनी लेकराची आस धरुन.                 क्षणा क्षणाला झुरायची.
दुसर्याच लेकरू पाहून.
ती आनंदान फुलायची.

बातमी भ्रुण हत्याची वाचता.
जीव तिचा कासाविस होई.
सांगू वांझ पणाची खंत कुणाला.
खंताच्या प्रवाहात वहात जाई.

कानी पडता वांझुटी शब्द.
टोचतात असंख्य शर काळजात.
भावनांना तिच्या समजनार कोण
नको देवा वांझ पणा नशिबात

नाव..स्टिफन कमलाकर खावडिया.
पत्ता..दिपमळा पाटस रोड दौंड जि.पुणे.
मो.नं.9673127794.

[4/15, 11:48 AM]

🌷🌷🌷🍀🍀🍀🌷🌷🌷
*स्पर्धेसाठी कविता*

             *प्रेरणा*
👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
                  दिनांक-१५/०४/२०१७

छोटंसं होतं एक झोपडं
त्यात मोडका तोडका संसार
भर पावसात गळायचं
त्याला काड्या-काटक्यांचा आधार..
       शुभ्र सकाळी चालायचा त्यात
             कवडशांचा खेळ सोनेरी
         सुखात न्हायचं मायेचं अंगण
           खाऊन चटणी अन् भाकरी
पहाटेपासून राबायचे
माझे माय नि बाप
दिन-रात कष्ट सोसायचे
लेकरांसाठी बेमाप....
           बाप माझा रांगडा
            वाहे भार सारा घराचा
            माय प्रेमाची सावली
            भरवायची घास आपुलकीचा
रक्ताचं पाणी करून
कष्टाने पैसा-अडका जमविला
शिक्षणासाठी लेकरांच्या
उभा जन्म त्यांनी वाहिला
        त्या घामाचीच परिणीती
      आम्ही शिकून सवरून मोठे झालो
        त्या कष्टाचेच फळ आज
       यशाच्या शिखरावर चढलो
स्मरता कष्ट माय-पित्याचे
आज अश्रू दाटती लोचना....
संकटात आम्हा भावंडांना
देतसे नवस्फूर्ती अन् *प्रेरणा*
देतसे नवस्फूर्ती अन् *प्रेरणा*

*माझ्या मायाळू माय पित्यास*
••••••••••••👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

सौ.प्रमिला काकासाहेब साळुंके
उंडवडी, ता.बरामती, जि. पुणे

[4/15, 11:52 AM]
*मुक्त काव्य स्पर्धेसाठी*
 
आई चे मुलीस पत्र,

विचारावेसे वाटतेय
बेटा तू कशी आहेस,
जवानीच्या चौकटीत
आता उभी आहेस,
आईची ही उब तुला
निराळी वाटत आसेल
मैत्रीणचा सहवासात राहू
असे वाटत आसेल..
             
आई बोल कडु वाटतील तुला..
पण बाळा....
बाईपणाचे बांळकडु
हे प्यावेच लागेल तुला....!
काळीज आईचे
आहे घर काळजीचे,
काळीज जळते
आहे तुझ्या काळजीने....!!
      
जीवनाच्या शर्यतीत
तुलाही ..
पुढे जायचे आहे..
जाऊन गगनाला
भीडायचे आहे..
तुला बेटा...!
किती भिडतील नजरा
तुला चालताना रस्त्यावर ,
अंजाण त्या नजरेना
तू भींडू नकोस ...
लक्ष तूझे
समोर ठेऊन मात्र
पुढे चल बेटा.....!!
     
अशा नजरेना
अंजण मारायला
शीक तु बेटा..
आईचे काळीज बोलतय...
हे बेटा..!
     
आयुष्याच्या शर्यतीत..
शील जपायला
शीक तू बाळा
...नसेल जरी
देहावरती चुनरी
तरी चालेल ..
होण्यार्या अत्याचाराला
जवाब द्यायला मात्र
शीक तू बेटा...!!

मोकळे तुझे केस जरी
बटांना सावरायला..
शीक तु...,
डसतील तुला साप येथे
जहर ओकायला मात्र
शीक तू बेटा....!!

नसते लिहिलेली जात
नराधमाची
त्याच्या भाळावरती..,
माणसाच्या आतील
नंराधमाला ओळखायला
शीक तू बेटा ..!!

खुप काही लीहले आहे..
विचार कर बेटा..
स्वतःच स्वताचे.. सावरायला..
शीक तू बेटा...!!

आईचे काळीज बोलतेय..
विचार कर बेटा
जप स्वतःला ..
तुझीच आई  ...  !!

सुरजकुमारी गोस्वामी,..
हैद्राबाद .  क्र ..4

[4/15, 11:59 AM]
स्पंदने
-----------

जमाना बदलला म्हणे
आता काॅम्पुटर आला.....
कामं व्हायला लागलीत पटपट
पण जिवंत हाताला कामच
उरलं नाही.....
बेकारांचे कारखाने माञ निर्माण
होतायतं क्षणाक्षणाला...
दारिद्र्यांचे आक्रोश
माॅनिटरमध्ये साचत नाहीत
आणि वात्सल्याची स्पंदन
कि बोर्ड मध्ये नाचत नाहीत..,
म्हणे आम्ही ग्लोबल झालो...
शेजार्‍यांच्या अंत्ययाञे दिवशी
दार लावून घेणारी संस्कृती
निर्माण झाली या तंञज्ञानामुळं...
तुम्ही कितीही पुढे जा,
पण..
आईच्या दूधानं तृप्त झालेल्या
लेकाराचा ढेकरातील आनंद
मोजण्याचं यंञ तुम्ही
शोधू शकणार नाही
हे माञ नक्की.....

-आबासाहेब निर्मळे.
नविन वसाहत पेठ वडगांव,
ता.हातकणंगले जि.कोल्हापूर.
9028090266.

[4/15, 12:55 PM]
*स्पर्धेसाठी हायकू रचना*

*हास्य भुलवी*
*वेड लावते जीवा*
*सौंदर्य वर्णावा*

*गुलाब कळी*
*ओठांवरी झुलते*
*मन रंगते*

*खाण रुपाची*
*प्रीत दाटे निळाई*
*तु जाई जुई*

*अचंबीत हे*
*खळखळले झरे*
*हसले सारे*

*ओढ लागते*
*पहाताच भेटीची*
*मन स्वप्नांची*

*काळीज झुले*
*नजर कटाक्षाने*
*भाव क्षणांने*

*सामाव प्रीत*
*दोन रे आधाराची*
*नित्य हक्काची*

*रोहिदास बापू होले*
*गोपाळवाडी ,दौंड ,पुणे*
*मो. ९०२८३४१५३६*

[4/15, 1:13 PM]
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
मुक्त कविता स्पर्धेसाठी

मधुरा

सख्या रे उपभोगली तू मधुप्रीत जरी
मधुरा ती तुझ्या अभावे राहिली उणे होऊनी

होते यौवनाच्या उंबरठ्यावर उभी
तुज पहाता उमटले मनी गुज लहरी
वाहिले मी सर्व तुजवर त्याच क्षणी
राहिले न मी माझी तव मन स्वैर होऊनी
मधुरा ती तुझ्या अभावे राहिली उणे होऊनी

वाढीले तुज ओंजळ भरभरूनी
पिले तू ते ती मधु मनसोक्त अमृतापरी
तेणे संपले ते स्नेह तुला अर्पुनी
स्वप्नी येत का रूसावे तसा हटृ धरूनी
मधुरा ती तुझ्या अभावे राहिली उणे होऊनी

मनात पुजिले मी तुला निरंतर
जरी मग प्रसंग असो कितीही कातर
वाहते मी अश्रूची फुले आठवात
तुझ्या वचनातील भाव ह्रदयी धरूनी
मधुरा ती तुझ्या अभावे राहिली उणे होऊनी

दिवसामागे दिवस जाती सरूनी
पहाट तिन्ही सांजा अभास तुझा सामोरी
आसवात देह माझा गेला विरूनी
ध्यास एकच रहावे मी तुझ्यात सामावूनी
मधुरा ती तुझ्या अभावे राहिली उणे होऊनी

          ६३ बंडोपंत कुलकर्णी सोलापूर
?🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

[4/15, 3:13 PM] ‪+91 98811 74784‬: *मुक्त काव्य स्पर्धेसाठी*

*चंद्रोख्यान*

प्रेयसी म्हणाली म्हणतोच आहेस तु
तर देच आणुन तो चंद्र मजला.

भेटल्यावर प्रियकर द्वितीय दिनी
म्हणाला, प्रिये, ठाऊक नाही का तुजला.

गेलो होतो मी चंद्रावर काल रातीला.
मोदक देतो चल म्हणालो माझ्या साथीला.

चंद्र म्हणाला, मला बरोबर कशास नेतो.
वचन दिले तिला मी चंद्रास घेऊन येतो.

चंद्र म्हणाला, मी तर आहे तिच्या हृदयात.
मी आहे पृथ्वीवर प्रकाशाच्या रुपात.

कुठे प्रियकर आहे तर कुठे प्रेयसी मी.
चतुर्थीचा चंद्र मी, मुलांचा चांदोमामा मी.

रोज देतो माझी उर्जा सर्वांना मी कृष्णपक्षी
क्षय होतो माझा याला तुम्ही सर्व साक्षी.

अमावस्येला पुर्णरुपाने असतो पृथ्वीवरती.
म्हणन तर मी मुळीच नसतो या आकाशावरती.

झालेला क्षय भरुन आणितो प्रत्येक शुध्दपक्षी.
झगमगतो मग पूर्णरुपाने पृथ्वीच्या या वक्षी.

*अजय जी बिरारी नाशिक*

Comments

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष साहित्य

Super 30 साहित्यिक पुरस्कार 2019

नववर्ष शुभेच्छा