नववर्ष शुभेच्छा


नववर्षाच्या शुभेच्छा चारोळ्यातुन.

साहित्य स्पंदन समुहाकडून सर्व साहित्य प्रेमी साहित्यिकांना नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा .......!

टीप :- चारोळी आवडल्यास नावासह share करण्यास आमची काही हरकत नाही. चारोळीत कुठलाही बदल करायचा असेल तर मूळ साहित्यिकांची परवानगी घ्यावी. धन्यवाद

Happy New Year - 2019

नव्या वर्षाचे नवे गीत
बहरू दे अशीच प्रीत
सर्वाना मिळो सुख शांती
त्यातच आहे आपले हीत

- नासा येवतीकर, धर्माबाद

नवीन वर्ष येणार आहे
जुने वर्षे जाणार आहे.
आनंद सारा देणार आहे
पुन्हा तोही जाणार आहे.

- राजेश जेटेवाड बरबडेकर

नव वर्षाच्या दिनी
नव ध्येय ठेवूया
पर्यावरणाच्या रक्षणार्थ
झाडे दत्तक घेवूया..

सारिका सब्बनवार, कुंडलवाडी

स्वागत करू या नववर्षाचे
नव धोरणाने नि संकल्पनेने
रंगवू या ना सोनेरी स्वप्नाला
देऊन बळ यशाच्या पंखांने

निर्मला सोनी, अमरावती

विसरूनि सारे भेद
पुन्हा एकत्र येवू या
समता,बंधुता, एकता
मूल्यांची जोपासना करू या..

सारिका सब्बनवार, कुंडलवाडी

शाळा हे विद्येचे मंदिर
ज्ञानदाते थोर गुरुवर
करा आत्मसात सुविचार
होईल जीवन निखळ सुंदर

सौ अंजली घंटेवार, नागपूर

आईबाबा मला
शाळेत जाऊ द्यां नवं...
नव्या वर्षांत
प्रवेश घेऊ द्या नवं...

- राजेश जेटेवाड बरबडेकर

येताच नवीन वर्ष
घ्यावा एकच ध्यास
करावे जीवन समृद्ध
धरावी नवजीवनाची कास

वैशाली देशमुख, नागपूर

भाव मित्रा मैत्रीचा
नववर्षी पण जपू या
हेवेदावे सोडून सारे
फुलासारखे हसू या

निर्मला सोनी, अमरावती

नववर्षाच्या स्वागताची
तयारी करु नवसंकल्पाने
संघर्षमय या दुनियेचे
स्वागत करु आनंदाने

श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड, जिल्हा. कोल्हापूर

संकल्प करू स्वच्छतेचा
निरोगी जीवन जगण्याचा
स्वच्छ भारत, सुंदर भारत
प्रत्यक्षात साकारण्याचा

सारिका सब्बनवार, कुंडलवाडी

नववर्षाच्या स्वागताची
करुया आपण तयारी
शब्द जपून वापरावे
आहे बरे ते दुधारी

मीना सानप बीड

शब्दांनी सूर जुळवून
जपूया आपुलकीची नाती
करूया नवसंकल्प मैत्रीचा
पेटवुन माणुसकीची ज्योती

प्रा. वैशाली देशमुख, नागपूर

पाणी वाचवा पाणी अडवा
मंत्र जपूनी मनी आपुल्या
निसर्गातील अनमोल ठेवा
काटकसरीने वापरू या ...

सारिका सब्बनवार, कुंडलवाडी

संस्काराची शाळा
पुन्हा पुन्हा भरू या
स्वागत नववर्षाचे
उत्साहाने करू या

निर्मला सोनी, अमरावती

भरपूर लिहावे
अन् वाचनही करावे...
नव्या वर्षांत आपण
सर्वात पुढे दिसावे...

- राजेश जेटेवाड बरबडेकर

हसत खेळत शिक्षणाचा
घेऊ सारे ध्यास
नववर्षात साधू आपण
विद्यार्थी विकास

सावित्री गायकवाड, पुणे

आले नवीन वर्ष
चला स्वागत करूया
नाही कुणाशी हेवा दावा
सर्वांशी प्रेमाने वागुया

रामकृष्ण पांडुरंग पाटील
विखरण,ता.जि.नंदुरबार

आनंदाने यावे वर्ष नवे
आनंदाने हे वर्ष सरावे
आपल्या सर्वांचे अतूट प्रेम
मनी कायम असेच ऊरावे

सोनाली मारोळकर

शब्द ओवले लेखणीतून
करू नववर्षाचा जागर
प्रगल्भता यावी विवेकातून
संगतीला प्रेमाचा सागर

वृषाली वानखडे, अमरावती

देऊन निरोप गत वर्षाला
स्वागत नव्या वर्षाचे करुया,
झाले गेले विसरूनी सारे
प्रगतीचे पंख हे पसरुया.

सो.आरती डिंगोरे , नाशिक

नवीन वर्ष नवे संकल्प
करूया निर्धार मनात
माणूस म्हणून माणसाला
करूया प्रेमाने मदत

रामकृष्ण पांडुरंग पाटील
विखरण,ता.जि.नंदुरबार

वृक्षतोडीस तुम्ही आता
देऊ नका थारा
पर्यावरण रक्षणाचा
वाहू द्या वारा

सावित्री गायकवाड, पुणे

Comments

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष साहित्य

Super 30 साहित्यिक पुरस्कार 2019